9890177962, 9604228996

     

saisevaschool@gmail.com

आमच्या विषयी

  • होम
  • आमच्या विषयी
साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा, शिर्डी

आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संचलित ‘ साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा ’ हे देश तसेच महाराष्ट्रातील mental ritarded म्हणजेच मतीमंद, गतिमंद व ऑटीझमग्रस्त मुलांसाठी काम करते. संस्थेचे तसेच शाळेचे संस्थापक मा.श्री. सुनिल शिवनाथ कवडे सर हे मतीमंद मुलांचे शिक्षक म्हणून काम करत असताना मतीमंद मुलांच्या अडचणी अगदी जवळून पाहिल्या. त्यात मतीमंद मुलींना विद्यालयात प्रवेश दिला जात नसे. इतरही अनेक अडचणी होत्या. ह्या सर्व समस्यांसाठी आपण स्वतःच काहीतरी केले पाहिजे ह्या विचाराची कास धरून सन १९९७ साली “ आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ “या नावाने संस्था सुरु केली. महाराष्ट्रातील अनेक संस्थांना भेटी देऊन तेथे कशाप्रकारे काम चालते हे समजून घेतले तसेच मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षण स्वतः घेतले आणि साईबाबांना अभिप्रेत असणारे काम सन २००० साली ‘ साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा ’ ह्या नावाने शिर्डी ( महाराष्ट्र ) येथे चालू केली. अवघ्या ७ मुलांपासून सुरु झालेली हि संस्था आज सुमारे ८५ निवासी मुलामुलींची काळजी घेत आहे. तसेच मतीमंद मुलींच्या निवासाची सोय असणारी हि एकमेव संस्था आहे. आज विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच पुनर्वसनाचेही धडे दिले जातात. मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यालयाचे कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहे.

साईसेवा टीचर ट्रेनिंग सेंटर, शिर्डी

मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षक असणे अत्यंत गरजेचे असते. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात कुठेच नव्हते. हि गरज ओळखून संस्थेने सन २००८ साली साई सेवा टीचर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली .या सेंटरला ‘Rehabilitation council of India ( RCI ) ‘ ची मान्यता असून ( RCI ) अंतर्गत All India Level Courses चालविले जातात. हा कोर्स २ वर्षांचा असून यासाठी शैक्षणिक अहर्ता १२ वी ( ५० %) आहे. सदर कोर्समध्ये मानसिक अपंगांच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रमांचा समावेश केलेला असतो. या अभ्यासक्रमात मानसिक अपंग मुलांच्या practical वर जास्त भर दिला जातो. मुलांसोबत समायोजन करणे, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवावे. त्यासाठी कोणत्या अध्यन अध्यापन पद्धतीचा वापर करावा, मानसिक अपंग मुलांच्या समस्या काय असतात व त्या कश्या पद्धतीने सोडविल्या जातात याचे मार्गदर्शन असते.

मतीमंद मुलांसाठी महाराष्ट्रात जे काही मोजकेच ट्रेनिंग सेंटर आहेत त्यापैकी साई सेवा टीचर ट्रेनिंग सेंटर एक आहे. हि नक्कीच आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. कुठलेही चांगले काम एक व्यक्ती करू शकत नाही त्याला अनेक व्यक्तींचा हातभार असतो. सदर संस्था सुरु करत असताना तसेच सुरु केल्यानंतर अनेक थोरामोठ्यांचे योगदान लाभले.

या सर्व कामासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची नेहमीच प्रेरणा असते तसेच कुटुंबियाची मिळत असलेली भरभक्कम साथ तर नेहमीच जमेची बाजू आहे. भविष्यात या मुलांच्या पुनर्वसनासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील.