9890177962, 9604228996

     

saisevaschool@gmail.com

विशेष उपचार

मतिमंद शाळेत येणारे प्रत्येक मूल वेगळे असते. त्याची बौद्धिक क्षमता वेगळी असते. साईसेवा शाळेत प्रत्येक मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार अभ्यासक्रम ठरवून शिकविले जाते. मतिमंद मुलांना प्रत्येक गोष्ट दाखवावी लागते. ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे त्यांच्या मनावर ठसवावी लागते. त्यामुळे ‘साईसेवा शाळे’त ऑडियो-व्हिडियोचा वापर जास्तीतजास्त प्रमाणात केला जातो.

मतिमंद विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास साधण्यासाठी खालील विशेष उपचारांचा वापर केला जातो.
१. विशेष शिक्षण
२. वाचा विकास थेरपी
३. व्यावसायिक चिकित्सा
४. सेन्सर इंटिग्रेशन चिकित्सा
५. कृती सुधार चिकित्सा
६. निराधार चाचणी प्रशिक्षण
७. ऑटिझम फिजिओथेरपी
८. रिमॅडिअल मेडिकल ट्रेनिंग
९. समुपदेशन
१०. पालक प्रशिक्षण कार्यक्रम

त्याचप्रमाणे साईसेवा शाळेने अठरा वर्षें शाळेत शिकल्यानंतर पुढे काय करायचे? पालकांच्या पश्चात त्या मुलांचे काय होणार? या प्रश्नांना उत्तर शोधले आहे. मतिमंदांना केवळ समाजाची सहानुभूती नको. त्यांना समाजाने त्यांच्यातील एक मानावे, यासाठी भाषिक सुधारणेसह स्वयंरोजगाराचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. मतिमंद मुले निसर्गाशी जवळीक छान साधतात. त्यामुळे त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शेतीचे काम शिकवले जाते. ‘साईसेवा शाळे’त शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्वयंरोजगार सुरू करून कुटुंबाला हातभार लावत आहेत.