9890177962, 9604228996

     

saisevaschool@gmail.com

मतिमंदत्व व प्रकार

  • होम
  • मतिमंदत्व व प्रकार

मतिमंदत्व यालाच बौद्धिक विकलांगता असेही म्हणतात. बौद्धिक विकलांगता एक विकासात्मक अपंगत्व आहे जी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येते. दैनंदिन जीवनात एक सर्वसामान्य माणसाला सर्वसाधारण गोष्टी शिकण्यासाठी जो कालावधी लागतो त्यापेक्षा जास्त कालावधी बौद्धिक विकलांगता असलेल्या मुलांना लागतो. आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जी वैचारिक, निर्णय घेण्याची तसेच नियोजन करण्याची क्षमता लागते, त्याला बुद्धी म्हणतात. १८ वर्षांच्या आधी बुद्धीची वाढ खुंटली किंवा मंदावली तर त्या अवस्थेला ‘मतिमंदत्व’ म्हणतात. व्यक्तीचे कालक्रमानुसारचे वय आणि तिचा बुद्धीचा विकास या दोन्हीमधले अंतर जितके जास्त तितके मतिमंदत्वाचे प्रमाण जास्त असते.

मतिमंदत्वाचे प्रकार खालील प्रमाणे :

स्वमग्नता (ऑटिझम Autism) + -

स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. इंग्रजीत त्याला ऑटिझम (Autism) असे म्हणतात. हि एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता ( ऑटिझम ) ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. अशी व्यक्ती आपल्याच विश्वात वा विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही.त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, स्वतामध्ये मग्न असणे, डोळ्यांची व हातांची विचित्र हालचाल करणे, एकच क्रिया परत परत करत राहणे हि स्वमग्नतेची लक्षणे काही आहे.

डाउन्स सिंड्रोम म्हणजे काय?
700 पैकी एका बाळामध्ये 21 नंबरच्या क्रोमोसोम (गुणसूत्र) दोनच्या ऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे डाउन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.
कारणे : डाउन्स सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही, पण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाउन्स सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय 35 असल्यास याची शक्यता वाढते.
लक्षणे : बाळाची वाढ खुंटणे, मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात जास्त प्रमुख लक्षण आहे. गोल चेहरा, मागून चपटे डोके, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे, चपटे नाक, मोठ्या आकाराची जीभ, या चेह-याच्या विशिष्ट लक्षणामुळे बाळाकडे बघूनच डाउन्स सिंड्रोमचे निदान होते. डोळ्यामध्ये बुबूळ, छोटी मान, मानेवर अधिक प्रमाणात त्वचा, कमी उंची, छोटे हात, पायाची व हाताची विशिष्ट प्रकाराची ठेवण, चिडचिडेपणा अशी लक्षणेही आढळतात.
डाउन्स सिंड्रोमसोबत येणारे इतर आजार : जन्मजात हृदयाच्या व्याधी, आतड्याच्या व्याधी मानेच्या हाडाची कमजोरी
डाउन्स सिंड्रोम टाळण्यासाठी :
गरोदर स्त्रियांमध्ये 14 ते 16 आठवड्यादरम्यान अल्फा फिटो प्रोटीन, इस्ट्रिइऑल व एच. सी. जी. या तपासण्या केल्यास 16 आठवड्यातच डाउन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. याला ट्रिपल टेस्ट असे म्हणतात. तसेच 18 ते 20 आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून निदान होऊ शकते. सहसा आधी डाउन्सचे बाळ जन्माला आल्यास व 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आईला या टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
उपचार : जर पालक, डॉक्टर व समाज यांनी हातात हात मिळून उपचार केले तर डाउन्स सिंड्रोमचे बाळ चांगले आयुष्य जगू शकते. डाउन्स सिंड्रोमला जोडून येणाºया आजारांची पडताळणी ही उपचारांची पहिली पायरी असते. म्हणून हृदय आजारांसाठी 2-डी इको, दरवर्षी मानेचा एक्सरे, थॉयराइडची तपासणी हा उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो. नियमित फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी हा उपचारांचा सर्वात मोठा स्तंभ ठरतो. स्नायूंची लवचीकता फिजिओथेरपीच्या साह्याने कमी करून मुलांना काम शिकवले जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य जगत असलेल्या डाउन्सची किती तरी उदाहरणे आहेत.

अपस्मार या शब्दाचा अर्थ झटका येणे, मिरगी येणे किंवा आकडी येणे असा होय. अचानक, अनियंत्रित, अतिशय प्रमाणाबाहेर अमर्याद मनावर आघात करणाऱ्या घटना की ज्यामुळे अबोध वर्तनात बदल होतात. अपस्मार हा आजार नसून तर एक साचेबदध किंवा रासायनिक विकृतीचे लक्षण आहे. अपस्माराची कक्षा सामान्यपासून तीव्रपर्यंत असू शकते.

मेंदूमध्ये cerebro spinal fluid नावाचा तरल पदर्थाचा साठा वाढल्यामुळे डोक्यातंर्गत दाब वाढून मेंदूची कवटीही वाढते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात दोष येतो. यालाच ‘जलमस्तिष्कता’ असे म्हणतात.

अपसामान्य लहान डोक्या सोबतच मतिमंदत्व येण्यास ‘लहानमस्तिष्कता’ असे म्हणतात.
अपंगत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय :
अनुवांशिक कारणे :

अ) रंगसुत्रे :
पुरूष व स्त्रीयांमध्ये ज्या 23 रंगसुत्रांच्या जोडया असतात. यामध्ये पुरूषांमधील 23 पैकी 22 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. या 22 जोडयांना ‘ॲटोझोमल क्रोमोझोम’ असे म्हणतात. तर 23 वी जोडी ही लिंगनिश्चितीची म्हणजेच ‘सेक्स डिटरमाईन’ असते. ती क्षक्ष (xx) किंवा क्षय (xy) परंतु स्त्रीयांमधील 23 च्या 23 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णंत: पुरूष्याच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते. 23 रंगसुत्रांच्या जोडयातील 21 व्या जोडीमध्ये एक अतिरिक्त रंगसुत्र आल्यास डाउन सिंड्रोम ही स्थिती उदभवते.

ब) गुणसुत्रे :
ज्याप्रमाणे रंगसुत्राच्या जोडया असतात त्याचप्रमाणे गुणसुत्रांच्याही जोडया असतात.

क) नात्यातील लग्न :
समान रक्त संबंधातील व्यक्तीशी विवाह संबंधातून जन्मास येणारे मुल अपंग असू शकते.

ड) जन्मपूर्व अवस्थेतील कारणे (Pre-natal Causes):
• स्त्री-पुरूष वय
• ‘क्ष‘ किरण तपासणी
• विषबाधा
• अमली पदार्थांचे सेवन
• अनियमीत रक्तदाब
• शारिरीक अथवा मानसिक आघात / अपघात
• गर्भपात करण्याचा प्रयत्न
• मधुमेह
• स्त्रीला रूबेलाची लागण
• अपस्मार
• संसर्गजन्य आजार‍
• हायपोझिया
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन
• गर्भवती स्त्रीचा आहार

७० पेक्षा कमी बुद्ध्यांक असणाऱ्या मुलास मतिमंद म्हणून संबोधले जाते. बुद्ध्यांक ७० ते ९० असणारे मूल गतिमंद म्हणून ओळखले जाते. मतिमंद व गतिमंद हे दोन्ही भिन्न गट आहेत. गतिमंदांना खूप वेळेस समजावून सांगितल्यावर समजते. मतिमंदापेक्षा गतिमंद इच्छित प्रगती साध्य करतात. गतिमंद मुलांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) हा त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे; पण यामध्ये जर झोपेचा विकार असेल तर दुर्दैवाने भावनिक बुद्धय़ांकदेखील कमी होतो. त्याचे परिणाम नुसते त्या व्यक्तीलाच नाही, तर सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात.