9890177962, 9096514301, 9511611518
saisevaschool@gmail.com
शाळेच्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे नम्रपणे स्वागत आहे. आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संचलित ‘ साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा ’ हे देश तसेच महाराष्ट्रातील mental retarded म्हणजेच मतीमंद, गतिमंद व ऑटीझमग्रस्त मुलांसाठी काम करते. विशेष बाब म्हणजे सदर मुलांच्या निवासाचीही सोय इथे केली गेलेली आहे. सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत मतीमंद मुलांच्या आकलनाचा स्तर कमी असतो. त्यासाठी प्रत्येक मुलासाठी विशेष लक्ष देऊन शिकवावे लागते. साईसेवा विद्यालयात हि सर्व काळजी घेतली जाते. सन २००० सालापासून अवघ्या ७ मुलांपासून सुरु झालेली हि संस्था आज सुमारे ८५ निवासी मुलामुलींची काळजी घेत आहे. आज विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच पुनर्वसनाचेही धडे दिले जातात. मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यालयाचे कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहे. त्याचेच फलित म्हणून आज विद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहे.